

समृद्ध शेतीसाठी दर्जेदार बियाणे
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आधुनिक बियाणे प्रक्रिया तंत्रज्ञान, थेट खरेदी करार आणि तज्ज्ञ कृषी सल्लागारांचे वेळेवर मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध.
शेतकऱ्यांसाठी तांत्रिक सेवा
पीक सल्ला सेवा
बियाणे उत्पादन
शासकीय योजना
पेरणीपासून काढणीपर्यंत अनुभवी कृषी तज्ज्ञांकडून स्थानिक माती आणि हवामानानुसार योग्य मार्गदर्शन दिले जाते.
शेतकऱ्यांच्या शेतात थेट दर्जेदार बियाणे उत्पादन कार्यक्रम राबवून त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम केले जाते.
भीष्मा एफपीओच्या माध्यमातून विविध शासकीय योजना आणि अनुदानांचा लाभ मिळवण्यासाठी विशेष मदत केली जाते.


थेट बायबॅक करार
आम्ही भीष्मा ग्रीनटेक एफपीओच्या सहकार्याने शेतकऱ्यांशी बियाणे उत्पादन करार करतो. उत्पादित केलेल्या सोयाबीन आणि इतर बियाण्यांची थेट खरेदी करून शेतकऱ्यांना बाजारापेक्षा अधिक नफा मिळवून देतो.
या करारामुळे शेतकऱ्यांचे बाजारातील चढ-उतारांपासून संरक्षण होते आणि त्यांच्या कष्टाला योग्य मोबदल्याची खात्री मिळते.
भीष्मा ग्रीनटेक प्रोडूसर कंपनी लि. सदस्य व्हा
आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये सामील होऊन आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि थेट खरेदी योजनेचा लाभ घ्या.


